साकोली : परिणय फुके आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भंडारा : साकोली मतदारसंघातून डॉ. परिणय फुके आघाडीवर आहेत. साकोली मतदारसंघातून दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे डॉ परिणय फुके यांना 4076 तर कॉंग्रेस नाना पटोले यांना 3852 मते मिळाली. येथून डॉ परिणय फुके यांनी 685 मतांची आघाडी घेतली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या साकोली मतदारसंघात भाजप उमेदवार राज्याचे वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके व कॉंग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांच्यात तुल्यबळ लढत आहे. मात्र, कॉंग्रेस बंडखोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सेवक वाघाये यांनी लढतीत चुरस निर्माण केली आहे. श्री. वाघाये यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या परंपरागत व्होटबॅंकचे विभाजन होण्याची शक्‍यता होती. तर, भाजपने स्थानिक उमेदवारास डावलून डॉ. फुके यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजीचे सूर होते.

निवडणुकीच्या दोन दिवस आधी नाना पटोले आणि परिणय फुके यांच्या समर्थकांमध्ये उडालेल्या चकामकीमुळेसुद्धा साकोलीच्या लढतीकडे लक्ष केंद्रीत झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakoli vidhan sabha election result parinay fuke ahead