सरकारच्या डेडलाईमुळे अल्पदराने विक्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - राज्य सरकारने केवळ 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याची घोषणा केली. सरकारने दिलेल्या या डेडलाइनमुळे उत्पादकांमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी अल्पदराने विक्री करण्यास सुरुवात केल्याचे चित्र विदर्भात सर्वत्र आहे. 

सरकारचे फसलेले नियोजन आणि यंदा विक्रमी उत्पादन यामुळे संपूर्ण राज्यभरात तूरखरेदीवरूनच कोंडी निर्माण झाली आहे. 

नागपूर - राज्य सरकारने केवळ 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याची घोषणा केली. सरकारने दिलेल्या या डेडलाइनमुळे उत्पादकांमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी अल्पदराने विक्री करण्यास सुरुवात केल्याचे चित्र विदर्भात सर्वत्र आहे. 

सरकारचे फसलेले नियोजन आणि यंदा विक्रमी उत्पादन यामुळे संपूर्ण राज्यभरात तूरखरेदीवरूनच कोंडी निर्माण झाली आहे. 

नाफेडच्या खरेदी केंद्रावर गेल्या महिनाभरापासून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. बाजारपेठेत हमीभावापेक्षा दर कमी असल्याने नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी शेतकरीच नव्हे तर काही व्यापाऱ्यांनीसुद्धा गर्दी केल्याची माहिती आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत 40 लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. अजून शेतकऱ्यांकडे जवळपास 12 लाख क्विंटल तूर शिल्लक आहे. मात्र, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरेदी केंद्रावर केवळ 22 तारखेपर्यंतच आलेली तूर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. 

तुरीला खरेदीदार व भाव मिळणार नाही या चिंतेमुळे काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना तीन हजार क्विंटलप्रमाणे तुरीची विक्री केल्याचे बोलले जात आहे. तर, काही बड्या व्यापाऱ्यांनीसुद्धा कोंडीचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या अडचण लक्षात सौदेबाजी करून अंत्यत कमी दराने तुरीची खरेदी केल्याची चर्चा कळमना व इतर बाजारपेठांमध्ये होती. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत पाचपट दर कमी 
विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचे सर्वाधिक 19 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. येथे उत्पादनावर भारतात तूरडाळीचा पुरवठा केला जातो. 

गेल्यावर्षी याच महिन्यात तुरीचे प्रतिक्विंटल दर 9 हजार रुपये होते. तर, यंदा 5 हजार 50 रुपये हमीभावाचा अपवाद वगळता बाजारपेठेत 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत हे दर पाचपट कमी आहे. 

शेतकऱ्यांची बाजारपेठेत भटकंती 
नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकण्याचा मार्ग बंद झाल्याने ज्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. त्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठेत तुरीला खरेदीदार व थोडा अधिक दर मिळतोय काय याची चाचपणी करण्यासाठी भटकंती सुरू केल्याचे चित्र आहे. 

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 
तूरखरेदीवरून सध्या निर्माण झालेल्या स्थितीमुळे तूर उत्पादकांमध्ये प्रंचड निराशेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या तुरीसंदर्भात सरकार काय निर्णय घेते. याकडेसुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: sale due to government deadlines