शहीद मुन्ना शेलुकार यांना नागपुरात मानवंदना

नागपूर ः शहीद मुन्ना शेलुकार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर, जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे.
नागपूर ः शहीद मुन्ना शेलुकार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर, जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे.

नागपूर : हिमस्खलनामुळे वीरमरण आलेले अमरावती जिल्ह्यातील चुरणी येथील शहीद मुन्ना शेलुकार यांचे पार्थिव आज, सायंकाळी नागपूर विमानतळावर आणण्यात आले. या प्रसंगी प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अमरावतीकडे रवाना झाले.
मुन्ना शेलुकार हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील चुरणी येथील रहिवासी आहे. आठ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात दाखल झाले. अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये ते तैनात होते. शिपाई मुन्ना शेलुकार यांना शुक्रवारी हिमस्खलनामुळे वीरमरण आले. आज, विमानाने नागपूर विमानतळावर शहीद शेलुकार यांचे पार्थिव आणले. प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर, जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर चिखलदरा तालुक्‍यातील चुरणी या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आज अंत्यसंस्कार
चिखलदरा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील चुर्णी (ढाना) येथील रहिवासी आणि भारतीय सैनिक मुन्ना पुनाजी सेलूकर यांना कर्तव्यावर असताना गुरुवारी (ता. 3) वीरमरण आले. ते बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी रात्री विमानाने नागपूर येथे पोहोचल्यानंतर ते चुर्णी (ढाना) येथे नेले जाईल. तेथे उद्या, रविवारी सकाळी 10.30 वाजता पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. शहीद मुन्ना सेलूकर यांच्या मृत्यूने वडील पुनाजी सेलूकर, भाऊ राजाजी सेलूकर, रामदास सेलूकर, सुंदरलाल सेलूकर, बहीण रामकली सेलूकर तसेच पत्नी पूजा सेलूकर यांच्यावर आभाळ कोसळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com