साळ्यावर केला तलवारीने हल्ला

file photo
file photo
नागपूर: गुंड प्रवृत्तीच्या जावईने क्षुल्लक कारणावरून पाच साथीदारांच्या मदतीने सासऱ्याच्या घरात तोडफोड केली. तसेच साळ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. सक्‍करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला; मात्र द्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन नाजीर खान (35, रा. वंजारीनगर) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. त्याचे दोन ठिकाणी चिकन सेंटर आहे. तसेच त्याने टोळी तयार केली आहे. त्याची सासुरवाडी सोमवारी क्‍वॉर्टर येथे असून, पत्नी पोलिस विभागात कार्यरत आहे. सोमवारी रात्री 10 वाजता मोहसीनची मुलगी ही मामा अशफाक पठाण याच्या घरी होती. तिने खेळायला मोबाइल मागितला. मात्र, मामा अशफाकने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे ती रडत होती. तेवढ्यात मोहसीन खान आला. त्याने मुलगी रडताना पाहून साळा अशफाकला जबर मारहाण केली. त्यानंतर लगेच घरी जाऊन सलमान नाजीर खान, बंटी, जुनैद व शाहरुख यांना घेऊन तलवार आणि चाकूसह परत आला. आरोपींनी अशफाकच्या घरात घुसून तोडफोड केली. गाडीचेही नुकसान केले. तसेच तलवारीने अशफाकवर हल्ला केला. या हल्ल्यात अशफाक जखमी झाला असून, सक्‍करदरा पोलिसांनी मोहसीन खान याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com