कुत्र्याच्या हल्ल्यात सांबर जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मूल (चंद्रपूर) : मुख्य मार्गालगत हिरव्या कुरणावर मनसोक्त चरणाऱ्या एका सांबराचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग करून जखमी केले. ही घटना सोमवारी (ता. 12) सकाळी येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर घडली.
शहराच्या तीन किलोमीटर अंतरापासून हिरवाईने नटलेल्या जंगलाला सुरुवात होते. या परिसरात वाघासह इतर वन्य पशू, पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. बऱ्याच प्राण्यांचा कर्मवीर महाविद्यालयाच्या जवळच वावर असतो.

काही दिवसांपूर्वीच एका अस्वलाने महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. जवळच रानतलाव असल्याने आणि दमदार पावसामुळे सर्वत्र हिरवे कुरण असल्याने या परिसरात सांबर, हरिण, अस्वल आणि मोर यांचा चांगलाच संचार वाढलेला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samber was injured in a dog attack