"शांती राजदूत' म्हणून जाणार समृद्धी, मयूरी इंग्लंडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अमरावती : अंबानगरीतील दोन युवतींची निवड "शांती राजदूत' म्हणून झाली आहे. इंग्लंड येथे होणाऱ्या सोहळ्यात त्या देशाचे प्रतिनिधित्व करतील. समृद्धी जोशी व मयूरी पोकळे अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. बडनेरा येथील प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंटच्या त्या विद्यार्थिनी आहेत. विद्युत अभियांत्रिकी विभागात त्या शिक्षण घेत आहेत.

लीला पुनावाला फाउंडेशनच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली. इंग्लंडमध्ये तीन आठवडे 12 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2019 पर्यंत ते "शांती राजदूत' म्हणून प्रतिनिधित्व करतील. इंग्लंड भेटीसाठी महाराष्ट्रातून 24 विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. ज्यात प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. आपल्यातील गुणांचा विकास करून लीला फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ज्या समाजात राहतो त्यावर एक सकारात्मक परिणाम कसा साधता येईल, याचा अभ्यास यात राहणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ऍड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, प्राचार्य डॉ. एम. एस. अली तसेच कार्यकारी सदस्य शंकर काळे, नितीन हिवसे, डॉ. वृषाली धांडे, डॉ. रागिणी धांडे, डॉ. पूनम चौधरी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. लीला पुनावाला फाउंडेशनच्या समन्वयक म्हणून सुप्रिया बेजलवार यांनी प्रयत्न केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samridhi, Mayuri will go to England as a "Ambassador of Peace"