
रोहा येथील तलाठी वैभव जनार्थन जाधव यांना नदीघाटावर अवैधरित्या जेसीबी व्दारे टिप्परमध्ये वाळू भरीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांनी नदीघाटावर दौरा केला.
भंडारा : मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर वाळूचोरी करणार्यांनी तलाठी वैभव जाधव यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी उद्यापासून असहकार आंदोलन करण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन दिले.
रोहा येथील तलाठी वैभव जनार्थन जाधव यांना नदीघाटावर अवैधरित्या जेसीबी व्दारे टिप्परमध्ये वाळू भरीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांनी नदीघाटावर दौरा केला. त्यांना क्रमाक नमुद नसलेल्या जेसीबीव्दारे टिप्पर (क्र. MH ३६ AA१८०९) मध्ये वाळू भरीत असल्याचे आढळून आले.
हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण
तलाठी यांना पाहुन सदर टिप्पर चालक वाळू खाली करून बडजबरीने पडून गेला. सदर तलाठी यांनी कार्यवाही करण्याचे उददेशाने सदर जेसीबी ची किल्ली स्वतः चे ताब्यात घेण्यासाठी जेसीबी मशिनवर चढला.तेव्हा आरोपी शुभम जाधवराव ठवकर यांने तलाठी यांना कंबर पकडून जमीनीवर पाडले व मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वेळीच तालुका कार्यलयातील पथक मौक्यावर येत असल्याचे समजताच सदर आरोपीने मोक्यावरून पळ काढला.
अशा घटना यापूर्वीसुध्दा घडलेल्या असून, प्रभावी कार्यवाहीचे अभावी वाळूमाफीयांची हिम्मंत दिवंसेदिवस वाढत आहे. सदर घटनेमुळे तलाठीवर्गाज भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर प्रकरणातील आरोपी यांस २४ तासांचे आंत अटक न करण्यात आल्यास मोहाडी तालुक्यातील सर्व तलाठी यांनी २७ नोव्हेंबरपासून असहकार्य आंदोलन करण्याचे निर्णय घेतलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ