एटापल्ली तालुक्यात वाळू तस्करी जोमात; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मनोहर बोरकर
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नागरिकांचे तक्रारीवरून दिनांक 29 में 2018 रोजी तलाठी कमलेश पराते यांनी मॉडल स्कूल इमारत बांधकाम स्थळी धाड़ टाकून चाळीस ब्रास अवैध वाळू साठवणुक केले प्रकरणी में प्रशांत कंट्रक्शन कंपनी विरुद्ध तहसीलदार यांना प्रतिवेदन सादर करण्यात आले होते. त्यावरून तहसील कार्यालयने पाच लाख सोळा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही केली होती. मात्र चार महीने कालावधी होऊनही संबधित ठेकेदाराकडून रक्कम भरणा करण्यात आली नाही.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्यात विविध शासकीय इमारती, रस्ते, नाली व खासगी इमारतीं बांधकामे गेली वर्षभरापासून केली जात आहेत.  या बांधकामांवर हजारो ब्रास अवैध वाळू तस्करी करून वापरली जात असून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडविला जात असतांना तालुका प्रशासनाकडून तस्करांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

एटापल्ली येथे मॉडल स्कूल, जिल्हा परिषद हायस्कुल, हालेवारा व जांबिया येथे शाळा इमारतींचे व वॉल कंपाउंडचे बांधकाम केली जात आहे या तसेच इतर बांधकामांवर शेकडो ब्रास अवैध वाळू तस्करी करून वापरली जात आहे. नागरिकांचे तक्रारीवरून दिनांक 29 में 2018 रोजी तलाठी कमलेश पराते यांनी मॉडल स्कूल इमारत बांधकाम स्थळी धाड़ टाकून चाळीस ब्रास अवैध वाळू साठवणुक केले प्रकरणी में प्रशांत कंट्रक्शन कंपनी विरुद्ध तहसीलदार यांना प्रतिवेदन सादर करण्यात आले होते. त्यावरून तहसील कार्यालयने पाच लाख सोळा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही केली होती. मात्र चार महीने कालावधी होऊनही संबधित ठेकेदाराकडून रक्कम भरणा करण्यात आली नाही.

etapalli

प्रशासनाकडून खासगी घरे बांधकाम करणारे नागरिकांवर तात्काळ कार्यवाही व दंडात्मक रक्कम वसूल केल्या जाते मात्र करोड़ो रूपये ठेकेदारीतुन कमविनाऱ्यांवर थातुर माथुर कार्यवाही का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे तालुक्यातील संपूर्ण रेती घाट हे वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असून नागरिकांनी तक्रार केल्यास साठवनुक केलेली वाळूवर कार्यवाहिचे अधिकार आमचे विभागाला नाही असे तर महसूल विभागाचे अधिकारी हे रेती घाट क्षेत्र परिसरात जाऊन कार्यवाही करण्याचे अधिकार नसल्याचे सांगतात मात्र सामान्य नागरिकांवर कार्यवाहिचे अधिकार या दोन्ही विभागांना असल्याचे दिसून येते, हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून वन व महसूल विभागच्या संयुक्त समिति कडून वाळू तस्करीची चौकशी करून दोषीवर कार्यवाहीची मागणी नागरिकांनी केली आहे. 

तालुक्यातील शासकीय इमारतीं, रस्ते, नाली व खासगी इमारतीं बांधकामें सुरु असून अवैध रेती तस्करी करून बांधकामे केली जात आहे वनविभागकडून गस्त वाढवुन तस्करावर नजर ठेवली जात आहे वाळू तस्करांवर कठोर कार्यवाही केली जाईल. - संजुदास राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली

Web Title: The sand smuggling in Atapalli taluka administration ignored the mafia