"तो' वाळूचा ट्रक मालकाच्या सुपूर्द करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर - रॉयल्टी असतानाही बेकायदेशीररीत्या वाळूचा ट्रक जप्त केल्याप्रकरणी तहसीलदारांवर ताशेरे ओढत "तो' ट्रक मालकाच्या सुपूर्द करण्याचे आदेश बुधवारी (ता. 29) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. 

नागपूर - रॉयल्टी असतानाही बेकायदेशीररीत्या वाळूचा ट्रक जप्त केल्याप्रकरणी तहसीलदारांवर ताशेरे ओढत "तो' ट्रक मालकाच्या सुपूर्द करण्याचे आदेश बुधवारी (ता. 29) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. 

नेहा अनिल आग्रे यांच्या मालकीच्या ट्रकमधून रॉयल्टीवर वाळू वाहतूक करण्यात येते. 10 मार्च 2017 रोजी चालकाने ट्रकमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील सावंगी रेतीघाट येथून दहा ब्रास वाळू भरली. चालक ट्रक नागपूरकडे घेऊन येत होता. दरम्यान, पवनीचे तहसीलदार सुखदेव वासनिक यांनी ट्रक थांबवला. यावेळी त्यांनी चालकाला होळीनिमित्त पन्नास हजार रुपये मागितले. ही रक्कम दिली तर वर्षभर ट्रक अडवणार नाही, असेही ते म्हणाले. ही बाब त्यांनी ट्रकमालकाला सांगितली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तहसीलदारांनी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ट्रक पवनी बसस्थानकाजवळ नेऊन जप्त केला. दुसऱ्या दिवशी ट्रकमालक तहसीलदाराकडे गेल्या आणि त्यांनी रॉयल्टी दाखवली. यानंतरही त्यांनी ट्रक सोडण्यास नकार दिला. त्यामुळे नेहा आग्रे यांनी पवनी येथील कनिष्ठ न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. वाळूचा ट्रक त्वरित मालकाच्या सुपूर्द करण्याचे आदेश 14 मार्च 2017 रोजी न्यायालयाने दिले. आदेशाची प्रत तहसीलदारांना दिली असता त्यांनी आदेश फाडून टाकला. तसेच पैसे घेतल्याशिवाय ट्रक सोडणार नसल्याचे सांगितले. यामुळे आग्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान रॉयल्टी असतानाही ट्रक जप्त करणे चुकीचे असल्याचे सांगत ट्रक मालकाला सुपूर्द करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. 

Web Title: Sandy handed over to the truck's owner