संग्रामपूरातील महिलांनी गणेशाचे स्वागत केले पर्यावरणपूरक पद्धतीने

sangrampur
sangrampur

संग्रामपूर (बुलडाणा) : सातपुड्याच्या कुशीतील महिला बचतगटांना पर्यावरण पूरक राखी, पर्यावरण पूरक रंग, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यचे प्रशिक्षण दिले जाते. यामधे प्रत्येक तालुक्यतील 10 बचतगटाप्रमाणे 13 तालुक्यतील एकुण 1300 महिलांना वरिल प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संग्रामपूर तालुक्यतील 30 शाळांमधे शाळूमाती, साध्या मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. तर 2014 पासून “इको फ्रेंडली गणेशा” आणि 'पर्यावर वाचवा' यावर अस्तित्व संस्था 
काम करत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती न वपरता शाडूमाती आणि मातीच्या गणेशमूर्ती विनामूल्य दिल्या जात आहेत.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सोनाला संस्थेच्या कार्यालयात मातीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. मलकापूर येथे गेल्या वर्षी बंसिलाल नगर संस्थेच्या कार्यालयात गणेशमूर्तींचा स्टॉल लावला होता आणि या वर्षी फक्त कार्यालयात नव्हे तर प्रदर्शनी मांडून गणेशमूर्ती देण्यात आल्या. 

गणपतीसाठी पर्यावरणपूरक रंग बनविणे आणि रंग देण्याचे प्रशिक्षण देऊन या सर्व महिला बाजारात स्टॉल लावून, ऑर्डर घेऊन, प्रदर्शनी लावणे या सर्व स्वरूपात स्वतःची बाजारपेठ स्वतः निर्माण करीत आहेत. मोदकनिर्मितीचाही श्रीगणेशा या महिलांनी केला आहे.

यामध्ये अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या मार्गदर्शनात महिलांनी मोदक बनवून विक्रीला ठेवले आहेत. त्यांचे सोबत आशा निम्बोलकर, दीपिका बाभुलकर, स्वाति गनगे, आरती तायडे, शरयु पाटील यांचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com