विहिरीच्या नोंदीसाठी दोनशे रुपये मागणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

विहिरीच्या नोंदीसाठी दोनशे रुपये मागणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी संग्रामपुरात घडला.

संग्रामपूर : विहिरीच्या नोंदीसाठी दोनशे रुपये मागणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी संग्रामपुरात घडला. नामुष्की होऊ नये म्हणून सदर तलाठ्याने हा विषय जागेवरच सीमित ठेवला. मात्र या घटनेची महसूल विभागात चागलीच चर्चा रंगत आहे.

प्राप्त माहिती नुसार संग्रामपूर तहसील पासून उत्तर दिशेला असलेल्या आठ किमी अंतराचे हलक्याचे तलाठी कामकाजाबाबत आणि शेतकऱ्यांसोबत वागणुकी संदर्भात चांगलेच वादग्रस्त आहेत. मुख्यालयी कधीच न राहणे आणी कार्यालयीन वेळेत हजर नसणे हा त्याचा गुणधर्म. कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे काम या तलाठ्या कडून विनामूल्य होणे म्हणजे भाग्यच म्हणा. असाच प्रकार तीन दिवसा पूर्वी वरवट रस्त्यावरील या तलाठी कार्यालयात घडला. धामणगाव शिवारातील शेतात संग्रामपुरातील एका शेतकऱ्यांची विहीर आहे वीज कनेक्शन आहे. त्या विहिरींची नोंद करण्याकरिता सदर शेतकरी आणि सोबत गावातीलच एक तरुण त्या तलाठ्या कडे गेले. तलाठी महोदयांनी नोंद करण्यासाठी सोबत असलेल्या युवकाचे कानात नोंदी साठी दोनशे रुपये घ्या त्यातले तुमी पन्नास ठेवा आणी दीडशे मला द्या. असे म्हणताच सदर युवकाने त्या तलाठ्याचे कानशिलात जोरदार लगावून दिली. क्षणभर कुणालाही काहीच समजले नाही. तलाठी ही चक्रावून जाऊन चूक लक्षात घेऊन गुपचूप राहला. हा विषय मंडळ अधिकारी यांनाही ठाऊक झाला पण नाहक महसुल विभागाची बदनामी नको. म्हणून सर्व काही चिडीचूप ठेवण्यात आले. परंतु दोन दिवसाने हा विषय चांगलाच चर्चेत आला हे विशेष!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sangrampur Talathi take a bribe