"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य

राजेश प्रायकर
सोमवार, 21 जानेवारी 2019

नागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी जैविक कचऱ्याची उचल करणाऱ्या सुपर हायजिन कंपनीकडे विल्हेवाटीची जबाबदारी दिली होती. मात्र, या कंपनीनेही आता हात वर केल्याने दिवसागणिक वाढणाऱ्या सॅनिटरी पॅड व डायपरचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे.

नागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी जैविक कचऱ्याची उचल करणाऱ्या सुपर हायजिन कंपनीकडे विल्हेवाटीची जबाबदारी दिली होती. मात्र, या कंपनीनेही आता हात वर केल्याने दिवसागणिक वाढणाऱ्या सॅनिटरी पॅड व डायपरचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे.
गेल्या काही वर्षात सॅनिटरी पॅडच्या वापरात दुप्पट वाढ झाली. घरगुती सॅनिटरी पॅड आणि डायपर हा वैद्यकीय कचरा असून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याची गरज आहे. मात्र, अद्यापही महापालिका याबाबत गंभीर झाल्याचे कुठेही दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विल्हेवाटीबाबत आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यामुळे महापालिकेने शहरातील वैद्यकीय कचऱ्याची उचल करणाऱ्या सुपर हायजिन या कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली होती. या कंपनीही काही दिवस ही सॅनिटरी पॅड, डायपरची उचल केली. परंतु, आता हात वर केले. त्यामुळे दररोज जमा होणाऱ्या 1200 टन कचऱ्यामध्ये जवळपास हजारो सॅनिटरी पॅड दिसून येतात. अनेक महिला अजूनही संकोच करीत असल्याने काही सॅनिटरी पॅड फ्लशच्या माध्यमातून सिवेज लाइनमध्ये जात आहे. त्यामुळे सिवेज लाइन तुंबण्याचे प्रकारही मोठे वाढले आहे. सिवेज लाइन स्वच्छतेदरम्यान सॅनिटरी पॅड बाहेर निघत असल्याचे एका आरोग्य निरीक्षकाने नमूद केले. विल्हेवाटीअभावी सॅनिटरी पॅडमुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत पायाभूत सुविधांनाही धक्का पोहोचत आहे. एकीकडे स्वच्छता सर्वेक्षणासाठी महापालिका शहर स्वच्छ करण्यात गुंतली असतानाच दररोजच्या कचऱ्यातील 40 टक्के प्रमाण असलेल्या सॅनिटरी पॅडच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हे वास्तव कधी स्वीकारणार महापालिका?
- प्रत्येक महिला तिच्या आयुष्यातील पाळीच्या काळात 8 ते 15 हजार सॅनिटरी पॅड, टॅम्पोज आणि लिनर्स वापरते.
- लहान मुलांना साधारणतः दोन वर्षांपर्यंत डायपर घातले जाते. या काळात प्रत्येक मूल दीड ते दोन हजार डायपर्स वापरते.
- देशातील 35 कोटी 50 लाख महिलांपैकी केवळ 12 टक्के महिलांना सॅनिटरी पॅड घेणे परवडते.
- येत्या पाच वर्षांत सॅनिटरी पॅड वापराचे प्रमाण चारपट होण्याची शक्‍यता आहे, पण विल्हेवाटीचे नियोजनच नाही.

दोन वर्षांपूर्वी धरमपेठ झोनमधील काही वसतिगृहात सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी डबे ठेवण्यात आले होते. सुपर हायजिन ही कंपनी उचल करून शास्त्रोक्ती पद्धतीने त्याची विल्हेवाट लावत होती. मात्र, आता या कंपनीनेही उचल करणे बंद केले. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेतली असून तोडगा काढण्याची विनंती केली.
- प्रगती पाटील, सभापती, महिला व बालकल्याण समिती, महापालिका.

Web Title: "Sanitary pad 'usage doubled, disposal void