संस्कृत भारतीयांची आत्मभाषा, ज्ञानभाषा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : मातृभाषेत आपलेपणा जाणवतो. रिलिजन नव्हे, तर धर्म म्हटल्याने आपलेसे वाटते. कल्चरऐवजी संस्कृती म्हटले, तर वेगळा भाव जाणवतो. राष्ट्र म्हटल्याने त्यामागचे महत्त्व अधिक चांगल्याने विशद होते. मातृभाषेतील हा भाव पाश्‍चात्य भाषांमध्ये नाही. म्हणूनच भारतीय भाषांचे संवर्धन आवश्‍यक आहे. संस्कृत सर्वांचीच आत्मभाषा, ज्ञानभाषा असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यापीठ व संस्कृतसंवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित "संस्कृतकक्ष्या' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी तर मंचावर लेखक चमू कृष्णशास्त्री उपस्थित होते. आज घराघरांत एकापेक्षा अधिक भाषांचा उपयोग होतो. याला लोक हिंग्लशचा दर्जा देत आहेत. जर भविष्यात मुलांनी देवाचे नावदेखील हिंग्लिशमध्ये घेण्यास प्रारंभ केला, तर त्याला मातृभाषेतील श्रद्धेचा भाव राहणार नाही. संस्कृत ही संगणकीय भाषा असल्याने जगभर संशोधन सुरू आहे. जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये संस्कृतचे अध्यापन होते. संस्कृतचे महत्त्व स्वीकारायचे नसलेल्यांनाही संस्कृत आत्मसात करावी लागत आहे. प्रत्येक भाषेत किमान 30 टक्‍के संस्कृत शब्द आहे. देशातील कोणतीही भाषा शिकायची असल्यास त्यासाठी चार महिन्यांचा काळ पुरेसा असल्याचे मत डॉ. भागवत यांनी व्यक्‍त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanskrit Bharati's self-language, knowledge language