स्क्रब टायफसग्रस्त गर्भवतींची प्रकृती चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नागपूर - स्क्रब टायफसचे उपराजधानीत थैमान पसरले आहे. मेडिकलमध्ये एकूण १२ रुग्ण भरती आहेत. यापैकी ६ रुग्ण अतिदक्षता विभागात भरती आहे. यापैकी स्क्रब टायफसच्या विळख्यात सापडलेल्या तीन गर्भवती माता असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर आहेत. तर बुधवारी आणखी तीन नवीन रुग्णांना हा आजार आढळून आला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी, २९ ऑगस्ट रोजी मेडिकलमध्ये भेट दिली. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी स्क्रब टायफसग्रस्त रुग्णांसदर्भात माहिती जाणून घेतली.

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ‘स्क्रब टायफस’ असलेल्या रुग्णांची गर्दी बघता नवीन अतिदक्षता विभाग उभारण्यासंदर्भात सूचना दिली. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी स्वाइन फ्लू वॉर्डात ‘सेमी आयसीयू’ तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. खाटांची संख्या वाढविण्यात येईल. औषध, इंजेक्‍शन तसेच इतरही साहित्य तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना देत यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. 

यापूर्वी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिकेचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत महापालिकेला तातडीने आजार नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले. मेडिकल-मेयोत एकूण २४ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले असून उपचारादरम्यान ६ जण दगावल्याची माहिती दिली. दगावलेल्याना मूत्रपिंड, ह्रदय, यकृताचे आजार होते. यामुळे मृत्यूचा आकडा फुगला असे ते म्हणाले. 

मेडिकलमध्ये दिलेल्या भेटीत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, डॉ. मुरारी सिंग, डॉ. गिरीश भुयार उपस्थित होते.

डेंगीसह वाढतोय स्वाइन फ्लू 
नागपूरसह विदर्भात डेंगीचे रुग्ण वाढले असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना विचारले असता, नागपूर महापालिकासह रुग्ण आढळलेल्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य विभागाने तातडीने तेथे सर्वेक्षण करून फवारणीसह उपचाराचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. स्वाइन फ्लूचे १० रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागातील बैठकीत आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल, डॉ. मिलिंद गणवीर, मेडिकलच्या प्रा. डॉ. योगेंद्र बनसोड, डॉ. सी. एम. बोकडे, मेयोचे डॉ. पी. पी. जोशी, डॉ. दीप्ती जैन, डॉ. अग्रवाल, महापालिकेचे डॉ. अनिल चिव्हाणे, जयश्री थोटे उपस्थित होते.

Web Title: Sarab Tayfas affected pregnant women health care