सारई शिकारप्रकरणी 14 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नवेगावबांध (जि. गोंदिया) - येथील राष्ट्रीय उद्यानात अवैधरीत्या प्रवेश करून सारई या दुर्मीळ प्राण्याच्या जोडीची शिकार करणाऱ्या 14 जणांना वनविभागाने अटक केली आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील रामपुरी बीट कक्ष क्रमांक 223 व 718 मध्ये येलोडी येथील शिकाऱ्यांनी सारई जोडीची 30 जूनला शिकार केल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 13) वनाधिकाऱ्यांनी मनोज मळकाम (रा. येलोडी) याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता अन्य लोकांची नावे उघड झाली. वनविभागाने या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी शिकार केल्याचे कबूल केले. यावरून वनविभागाने गुन्हा दाखल करून अटक केली.
Web Title: sarai animal hunting crime