मुख्यमंत्र्यांनी पार्वती देवीला भेट दिलेल्या साडीची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

सिरोंचा, (जि. गडचिरोली) : सिरोंचानजीकच्या तेलंगण राज्यातील कालेश्वर येथील पवित्र कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिराला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सहपत्निक भेट दिली होती. तसेच या मंदिरातील पार्वती देवीला मुकुट व साडी भेट दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली साडी मंदिरातून चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंडळाचे हरिप्रकाश आणि बुर्री श्रीनिवास यांना निलंबित करण्यात आले.

2 जून 2016 ला मेडीगड्ड सिंचन प्रकल्प कोनशीलन्यास करण्यासाठी तेलांगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सपत्निक कालेश्वरला आले होते. त्यांनी मंदिराला भेट देऊन कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पार्वती देवीला सोन्याची मुकुटासह एक महागडी साडी भेट दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी देवीला भेट दिलेल्या या साडी चोरी झाल्याची घटना आठवडा भरापूर्वी उघडकीस आली. त्यानंतर तेलंगण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच तेलंगण सरकारने या मंदिराचे या पूर्वीचे विश्वस्त मंडळाचे ई. ओ. हरिप्रकाश आणि बुर्री श्रीनिवास यांना निलंबित केले. जिल्हाधिकारी, राज्याचे पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आदींनी कालेश्‍वर मंदिराला भेट देऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे प्रकरण तेलंगण सरकारने गंभीरतेने घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: saree stolen from temple given by cm