स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी अधिकाऱ्याला दिली साडीचोळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

भंडारा : जिल्ह्यात महिलांकरिता स्वतंत्र रुग्णालय स्थापनेकरिता निधीची उपलब्धता होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे बांधकाम रेंगाळले आहे. याचा निषेध करून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना सोमवारी साडीचोळी आणि बांगड्या भेट दिल्या. लवकरच महिला रुग्णालयाचे काम सुरू होणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भंडारा येथे स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या स्थापनेला राज्य शासनाने 2013 मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु, सहा वर्षांचा कालावधी लोटूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे कामाला सुरुवात झाली नाही.

महिला रुग्णालयाबाबत वेळकाढू धोरणाचा निषेध म्हणून सोमवारी शिवसेना महिला आघाडीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या उपअभियंता विजया सावरकर यांना निवेदन देऊन कार्यकारी अभियंत्यांना देण्यासाठी साडीचोळी आणि बांगड्या भेट दिल्या.
महिला रुग्णालयाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करा. अन्यथा, शिवसेना महिला आघाडीद्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा गायधने, जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ, जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, युवासेना सचिव दुर्गा भोसले, युवासेना कार्यकारी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शीतल देवरुखकर शेठ, पुरुषोत्तम टेंभरे, बाळू फुलबांधे, आशीष चुटे, अनिल गायधने, प्रकाश लसुंते, विजय काटेखाये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarees were handed over to an officer for an independent women's hospital