सरपंचाच्या भासऱ्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

यवतमाळ : धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी महिला सरपंचाने चार हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना सरपंचाच्या भासऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई आज, मंगळवारी अकोलाबाजार ते सावळी सदोबा मार्गावरील पेट्रोलपंपानजीक करण्यात आली. प्रियांका नीतेश चव्हाण (रा. वरझडी) असे लाच मागणाऱ्या सरपंचाचे नाव आहे, तर लक्ष्मण कैलास चव्हाण हा सरपंचाचा भासरा एसीबीच्या जाळ्यात अडकला.

महिला सरपंच प्रियांका चव्हाण यांनी वरझडी येथे केलेल्या अंगणवाडी दुरुस्ती व शौचालय बांधकामाच्या मंजूर झालेल्या 42 हजार रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. चर्चेदरम्यान लक्ष्मणने लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून मंगळवारी (ता. एक) अकोलाबाजार ते सदोबा सावळी रोडवर सापळा रचण्यात आला. यावेळी लक्ष्मणला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Sarpanch's brother-in-law arrested for taking a bribe