शनिवार, रविवारची सुटी रद्द

Saturday, Sunday Holiday canceled
Saturday, Sunday Holiday canceled

अकोला : जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या प्रलंबित लेखा परिच्छेदांचा निपटारा करण्यासाठी शनिवार (ता.14) व रविवारची (ता.15) शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे. यासंबंधिचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेसह पंचायत समितीस्तरावर 9 हजार 167 लेखा आक्षेप प्रलंबित आहेत. या प्रलंबित आक्षेपांचा तातडीने निपटारा करण्यात येत नाही. सदर प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा होत नसल्यामुळे त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या सर्व प्रलंबित परिच्छेदांचे अनुपालन करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्याची शनिवार (ता.14) व रविवारची शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे. संबंधित दिवशी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून 100 टक्के लेखा परिच्छेदांचे अनुपालन तयार करावे, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही
शनिवार व रविवाची शासकीय सुटी रद्द करण्यात आल्यामुळे या कालावधीत कोणीही रजेवर जावू नये, काही अपरिहार्य कारणांमुळे रजा आवश्‍यक असल्यास मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची पूर्व परवानगी घेवूनच रजेवर जावे. विनापरवानगी अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्यांना अनधिकृत गैरहजर समजून पुढील शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सुद्धा जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com