esakal | सेव मेरिट सेव नेशन आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

सेव मेरिट सेव नेशन आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : आरक्षणाच्या मुद्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता.24) सेव मेरिट सेव नेशन मोहिमेंतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्‍केपेक्षा अधिक असू नये, महाराष्ट्र सरकारने गुणवंत व प्रतिभावंतना संरक्षण द्यावे, या मागण्या शासनदरबारी पोहचाव्यात, म्हणून "सेव मेरिट सेव नेशन' मोहिमेंतर्गत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या निवासस्थानसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. आंदोलकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असून या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आंदोलनात सेव मेरीट सेव नेशन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा समोवश होता.

loading image
go to top