सवित्रीबाई फुले विद्यापीठाचा नामविस्तार करा

savitribai phule university
savitribai phule university

अकोला : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच नामांतरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, असे करण्याची मागणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षण परिषदेचे सदस्य डॉ.संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. 


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नामांतरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर, असे करण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना केल्याच्या वृत्ताचा हवाला देऊन डॉ.खडक्कार यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खडक्कार म्हणतात की, तत्कालीन पुणे विद्यापीठाचे नामांतरण 9 ऑगस्ट 2014 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले होते. ब्रिटीश राजवटीत महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठास देऊन हा एकप्रकारे त्यांचा गौरव करण्यात आला होता. आता यामध्ये थोडासा बदल करून विद्यापीठास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ"असे करण्यात यावे, अशी विनंती खडक्कार यांनी पत्रातून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com