घोटाळेबाज पुन्हा ‘डिव्हिजन वन’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नागपूर - ११९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या अभियंत्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारचे आदेश धुडकावून त्याच विभागात आणि प्रमुख प्रदावर नियुक्ती केली आहे. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून यात मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे. 

नागपूर - ११९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या अभियंत्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारचे आदेश धुडकावून त्याच विभागात आणि प्रमुख प्रदावर नियुक्ती केली आहे. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून यात मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे. 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात ११९ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या घोटाळ्याच्या प्रकरणात २४ अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. यात कार्यकारी, उप आणि कनिष्ठ दर्जाच्या अभियंत्यांचा समावेश होता. त्यानंतर काही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. उर्वरितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नंतर या सर्व निलंबित अभियंत्यांना सेवेत परत घेण्यात आले. सेवेत परत घेताना सरकारने काही अटी घातल्या होत्या. यात सर्व घोटाळा डिव्हिजन-१  मधील असल्याने त्यांना पुन्हा याच विभागात नियुक्त करण्यात  येऊ नये, तसेच प्रमुख पदावर त्यांनी नियुक्ती करण्यात येऊ नये याचा समावेश होता. चौकशीवर परिणाम होता कामा नये म्हणून या अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारच्या आदेशाचेच उल्लंघन करून काही अभियंत्यांना डिव्हिजन-१ आणि मेडिकल इंटिग्रेडमध्ये नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार निवास येथील कनिष्ठ अभियंता यांची पदोन्नती झाल्याने त्यांची बदली इतरत्र करण्यात आली. त्यांच्या जागी बांधकाम मंडळ येथे कार्यरत असलेल्या अभियंत्याकडे आमदार निवासाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर तीन ते चार अधिकाऱ्यांना मेडिकल इंटिग्रेडवर नियुक्ती देण्यात आली.  या सर्व अभियंत्यांवर ११९ कोटींच्या घोटाळा प्रकरणात विभागीय चौकशी सुरू आहे.  

घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. दोषींची शिक्षाही निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे काहींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही कर्मचारी न्यायालयात गेले आहेत. 
- उल्हास देबडवार, मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी, नागपूर विभाग.

Web Title: scam again in Division One