scam in rice crop selling in aasgaon of bhandara
scam in rice crop selling in aasgaon of bhandara

पवनीत धानखरेदीत गोंधळ, सदोष नियोजनामुळे शेतकरी

आसगाव (जि. भंडारा ) : पवनी तालुक्‍यातील धानखरेदी केंद्रांची सुरुवात मोठ्या थाटामाटाने करण्यात आली. पण, या केंद्रांवर सुरळीत धानखरेदी सुरू नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत कोणत्याही केंद्रात पुरेशा प्रमाणात खरेदी होत नसल्याने मार्चमध्ये धानविक्रीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नियोजनाचा अभाव आणि योग्य पद्धतीचा अवलंब होत नसल्यामुळे शेतकऱ्यांत आक्रोश वाढीस लागला आहे. 

पवनी तालुक्‍यात फक्त आठ खरेदी केंद्र आहेत. त्यांच्याकडे अपुरे गोडाऊनसुद्धा कमी क्षमतेचे आहेत. त्यामुळे धान मोजण्यासाठी ज्या प्रमाणात वजनकाटे उपलब्ध व्हायला पाहिजे, ते उपलब्ध होत नाही. केंद्रावर हमीभावानुसार भाव चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची धान विकण्यासाठी गर्दी होत आहे. खरेदी सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी होऊन अजूनही सर्व केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी फक्त 200 ते 300 शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी झाली आहे.

या खरेदी केंद्रात वजन काटे वाढवले तर, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी होऊ शकते. नवीन संस्थांना केंद्र चालविण्यास परवानगी दिली जात नाही. तसे झाले तर, जुन्या केंद्रावरील शेतकऱ्यांचा भार कमी करता येईल. दोन दिवसांपूर्वी गोसे येथील केंद्रावर शेतकऱ्यांचा असंतोष पाहायला मिळाला. पवनी तहसील कार्यालयात चौकशीसाठी निवेदन देण्यात आले. त्यानुसार चौकशी सुरू आहे. पण यादरम्यान धानमोजणी बंद आहेत. त्यामुळे पुन्हा या केंद्रांत शेतकऱ्यांचा असंतोष वाढणार आहे. काही केंद्रावरील बारदाना संपलेला आहे. पण तो पाठवला जात नाही. काही केंद्रातील गोडाऊन तुडूंब भरले तरी, मिल मालक धान उचलायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्रात नवीन धानखरेदी बंद आहे.

केंद्रासमोर खुल्या जागेत धानमोजणी करण्याची परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. या सर्वांमध्ये नियोजनाचा अभाव जबाबदार असल्याचे बोलले जाते. जवळच्या इतर तालुक्‍यात अशी समस्या दिसत नाही. पण, पवनी तालुक्‍यात दरवर्षी कमी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचा असंतोष पहायला मिळतो. शेजारच्या लाखांदूर व भंडारा तालुक्‍यांचा विचार केला तर, तिथे शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी सुरळीत सुरू आहे. पण पवनी तालुका नेहमी मागेच राहतो. खरेदी केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. 

दोन महिन्यात विक्रीची लगबग -
शेतकऱ्यांना हमीभाव आणि शासनाने जाहीर केलेल्या बोनसमुळे धानाची खरेदी केंद्रातच विक्री करायची आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी बाजारात तांदूळ विकण्यास तयार नाही. यामुळे खरेदी केंद्रांवर ताण निर्माण झाला आहे. त्यातही पवनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता खरेदीसाठी दिलेल्या केंद्रांची संख्या फारच कमी आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत मोजक्‍याच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी झाल्यामुळे इतर शेतकऱ्यांना मार्चपर्यंत आपल्या धानाची विक्री करण्याची घाई होत आहे.

धानखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत असल्यामुळे खूप त्रास होत आहे. यावर उपाययोजना करून नवीन केंद्रांना परवानगी देण्यात यावी किंवा केंद्रातील वजनकाट्यांची संख्या वाढवावी.
-मोहन लांजेवार, अध्यक्ष, विकाससं, मोहरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com