नागपुरातील शाळांमध्ये भंडाऱ्याचे सुगंधी दूध 

नागपुरातील शाळांमध्ये भंडाऱ्याचे सुगंधी दूध 

भंडारा -  नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दूध वाटप सुरू केले आहे. सध्या नागपूर महानगरातील झोपडपट्टी भागातील शाळांतील १० हजार विद्यार्थ्यांना सुगंधी दूधपुरवठा करण्यात येत आहे. यानंतर जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा दूधपुरवठा करण्यात येणार आहे.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने सीएसआर निधीअंतर्गत शाळकरी मुलांच्या पोषणासाठी दूध वाटपाची योजना सुरू केली आहे. यातून सर्वांत प्रथम नागपूर महानगरातील झोपडपट्टी भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येकी २०० ग्रॅम सुगंधी दूधपुरवठा करण्यात येत आहे.

या योजनेतून नागपूर शहरातील ३८ शाळांच्या १० हजार विद्यार्थ्यांना दूध दिले जाते. याकरिता भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाद्वारे दररोज १७०० लिटर दूध पुरवठा करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना दोन ते तीन चवीचे दूध मिळत आहे. 

यानंतर याच योजनेतून दुर्गम भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सुगंधी दूधपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज दूध वाटप केल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढणार यात शंका नाही.

शाळेत आइस बॉक्‍स
सर्व शाळांना दूधपुरवठा एकाच वेळी होणे शक्‍य नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेत आइस बॉक्‍सची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांतील कुपोषण कमी होण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा केल्याबद्दल दूध संघाला डेअरी बोर्डाकडून दरमहा पेमेन्ट मिळत असल्याचे संघाचे व्यवस्थापक करण रामटेके यांनी सांगितले. यानंतर दुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com