अख्ख्या वर्गाला लागलंय कवितेचं 'याड'

सतीश  तुळसकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

उमरेड - मराठी साहित्य संमेलनाचा विषय सदया फार चर्चेचा आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कवितेकडे वळण्यासाठी किती प्रयत्न होत आहेत, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. परंतु साहित्यीकाची पिढी घडविण्यासाठी त्याची पायाभरणी करणारा एक स्तुत्य उपक्रम उमरेड तालुक्‍यांतर्गतील बोरीमजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होत आहे. शेतकरी, शेतमजुरांची मुले शिकत असलेल्या बोरीमजरा शाळेत मात्र मुख्याध्यापक एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात भविष्यात अनेक कवी समोर येण्याची शक्‍यता ‘स्मार्ट अभिव्यक्‍ती’ या उपक्रमातून निर्माण झाली आहे.

ग्रामीण जीवनात प्रत्यक्षात पुढे आलेल्या अनुभवाचे शाब्दीक चित्रण, शेतक-यांच्या समस्या, झाडे, वृक्षवल्ली आणि शाळेतील शिक्षकविषयीचा अभिमान या उदयोन्मुख कवी-कवियत्रींच्या कवितांमधून उमटत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा साहित्याच्या अंगाने सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने सर्जनशील शिक्षक म्हणून सुपरिचित असलेले एकनाथ पवार हे विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती विकासाचा, कविता लेखनाचा हा सहशालेय उपक्रम दर शनिवारी राबवित असतात. बालसुलभता, सभोवतालच्या परिसराचे चित्रण, त्याची मांडणी आणि आशयसंपन्नता हे कवितेचे महत्वपूर्ण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत.

त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे  विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर एवढ्‌या कमी वयात ते कवी म्हणून पुढे येत आहेत. नंदिनी सडमाके, ऋतुषक नेहारे, ओम बोटरे, हिमांशू गावंडे या विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता अतिशय कौतुकास्पद आहेत.
वृक्षाला आपण काही नाही देत, हे बरोबर नाही
वृृक्षाला आता जगवलंच पाहिजे ! 

ही संवेदनशीलता ऋतुषक नेवारे याने ‘वृक्ष माझा सोबती’ या कवितेमधून मांडली आहे. गद्य व पद्य असे दोन्ही स्वरूपाचे  लेखन करणारे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उदयोन्मुख कवी म्हणून घडत असल्याचा आनंद पालकांमध्ये दिसून येत आहे.

Web Title: School Class Student Poem