गंभीर! मजुराच्या मुलीवर शाळा संचालकाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नागपूर : शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन एका नामांकित शाळेच्या संचालकाने बलात्कार केला. एवढेच नाही तर तिच्या लहान बहिणीशी देखील अश्‍लिल चाळे केले. आरोपीने हा सर्व प्रकार मुलींच्या आईच्या संगनमताने केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आरोपीसह मुलीच्या आईविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही गंभीर घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली. अशोक जयस्वाल (वय 50, रा. वाठोडा) असे शाळा संचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवणी गावातील एक दाम्पत्य नागपुरात कामाच्या शोधात आले होते. त्यांना खरबीतील नामांकित इंग्रजी शाळेचा संचालक अशोक जयस्वाल यांच्या वाठोड्यातील शेतावर काम मिळाले. जयस्वालचे वाठोड्यातील शेतावर फार्म हाऊस आहे. येथे दोघेही दाम्पत्य 17 आणि 15 वर्षांच्या दोन मुलींसह राहत होते. दरम्यान, जयस्वालची वाईट नजर शेतमजुराच्या पत्नीवर गेली. त्यामुळे त्याने दर रविवारी फार्मवर येणे-जाणे सुरू केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी आणि पैसे देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. दारूडा असलेल्या जयस्वालची नजर शेतमजुराच्या मोठ्या मुलीवर गेली. आरोपीने शेतमजुराला बहाण्याने मध्यप्रदेशला पाठवले. त्यानंतर त्याने आईला जाळ्यात ओढून मुलीला शारीरिक संबंधासाठी तयार करण्यासाठी दबाव टाकला. त्यासाठी पैसे आणि कपडे देण्याचे आमिषही दिले. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑक्‍टोबर 2016 मध्ये पहिल्यांदा मोठ्या मुलीवर अशोक जयस्वालने बलात्कार केला. त्यावेळी तिची आई घराबाहेर पहारा देत बसली होती. अशाप्रकारे जयस्वाल वाट्‌टेल तेव्हा फार्म हाऊसवर येऊन मुलीवर बळजबरी करायचा तसेच आईशीही संबंध ठेवायचा. तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार सहन केल्यानंतर अशोक जयस्वालच्या पापाचा घडा फुटला. मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी शाळा संचालक अशोक जयस्वाल आणि मुलीच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल केला.

आई द्यायची नशेच्या गोळ्या
मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तिची आई मुलीला नशेच्या गोळ्या खाऊ घालायची. त्यानंतर फार्म हाऊसबाहेर लहान मुलीला घेऊन बसायची. तर अशोक जयस्वाल अल्पवयीन मुलीशी सुद्धा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तब्बल तीन वर्षे हा लैंगिक अत्याचार मुलीने सहन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school director raped on labaour's minor daughter