शाळा संस्था वाद उठला विद्यार्थ्याच्या जिवावर

The school establishment disputes Damage students Educational careear
The school establishment disputes Damage students Educational careear

चिमूर- चिमूर येथील शैक्षणीक क्षेत्रात मागील सोळा वर्षापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. चालु शैक्षणिक सत्रात या शाळेची मान्यता काढुन पुर्ववत गांधी सेवा शिक्षण समीती चिमूर यांना शाळा हस्तांतरण करन्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी संध्या स्थित कार्यरत शाळा, संस्था व मुख्यापकाला पाठविल्यामुळे विद्यार्थी व पालकात धडकी भरली आहे. त्यामुळे तत्कालीन शाळा संस्था व कार्यरत संस्था मध्ये वादाचे वादळ निर्माण झाले आहे त्यामुळे चालु शैक्षणिक सत्रात शाळेचे हस्तांतरण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होनार आहे. मात्र संस्था वाद हा आज विद्यार्थ्यांच्या जिवावर उठल्याचे चित्र दिसत आहे.



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या चिमूर क्रांती भूमीत शैक्षणिक क्षेत्रात पुढाकार घेत तुकडोजी महाराज यांनी परिसरात ग्रामीण भागात शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने गांधी सेवा शिक्षण समीतीची स्थापना सन 1952ला केली. या संस्थेच्या मार्फत श्री राष्ट्रीय प्राथमिक शाळा, श्री राष्ट्रीय विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय सुरू करण्यात आले, मात्र कालांतराने श्री राष्ट्रीय विद्यालयातील मुख्याध्यापक पदाचा वाद त्यावर नियंत्रण करीता वादंग झाल्याने अखेर शाळेची मान्यता 25 ( अ ) अंतर्गत 2001 मध्ये काढण्यात आली. व दीड वर्ष श्री राष्ट्रीय विद्यालय हि शाळा बंद राहीली त्यामुळे विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांचे नुकसान झाले.

दरम्यान, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी अखेर कर्मचाऱ्यांना समाविष्ठ करण्याच्या अटीवर 2002 मध्ये श्री वंदनीय रास्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था द्वारे न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू करन्यात आले. या शैक्षणीक संस्थेत अंदाजे आठशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहे. चालु संस्थेकडून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पुरविल्या जात आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा निकाल छान आहे. कार्यरत संस्थेच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही. मात्र 5 सप्टेंबरला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शाळा हस्तांतरनाचा आदेश काढला त्यावर चंद्रपूर शिक्षणाधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोनातुन दोन्ही संस्था, गटशिक्षण अधीकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या नावाने 10 सप्टेंबरला आदेश काढले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांत शिक्षणाविषयी धडकी भरली आहे. त्यामुळे शाळा संस्थाच्या वादात आपल्या पाल्यांचे शैक्षणीक नुकसान होवू नये पाल्याच्या भविष्याकरीता शाळेतुन नाव कमी करून मुख्याध्यापकाला टिसीसाठी पालकांनी अर्ज केला आहे.



शाळा हस्तांतरण प्रक्रिया संबधात शाळेला शिक्षण विभागाकडून कोणतेही पत्र किंवा आदेश मिळाला नाही. मात्र शिक्षण विभागाचे शाळा हस्तांतरनाचे पत्र सोशल माध्यमात वायरल झाल्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यात शैक्षणिक नुकसान होणार अशी भिती निर्माण झाली. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या टिसीसाठी अर्ज केले आहे.-किशोर खोब्रागडे, मुख्याध्यापक न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com