शाळांचे शुल्क भरावेच लागणार, केवळ टप्प्याटप्प्याने एवढाच दिलासा

fees.
fees.

चंद्रपूर : लॉकडाउन कालावधीत शुल्कवाढ आणि फी वसुली न करण्याचे शासनाचे आदेश तात्पुरते होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाले असून, सर्व संस्थाचालक, व्यवस्थापकांच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. शुल्क माफ करण्याचा कोणताही आदेश शासनाने दिला नसल्यामुळे शाळेची फी भरायची नाही, अशा संभ्रमात पालकांनी राहू नये. केवळ फी एकमुस्त न घेता टप्प्याटप्याने घेण्याचे शासन निर्णयात नमूद केले असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थी आणि पालकांकडून शैक्षणिक वर्ष २०१९-२० ची शिल्लक व वर्ष २०२०-२१ मधील देय होत असणारी शाळेची वार्षिक फी एकदाच न घेता मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय शाळेने पालकांना द्यावा, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यामुळे पालकांनी टप्प्याटप्प्याने फी भरण्याचा अर्ज शाळेकडे केला, तर शाळा तसे टप्पे पाडून शुल्क भरण्याची सवलत देईल.

शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कोणतीही फी वाढ करू नये. या वर्षात जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे. लॉकडाउन कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय देण्यात यावा, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. परंतु, लॉकडाउन घोषित कालावधीत पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेची फी भरू नये या प्रकारचा कोणताही निर्णय शासनाने निर्गमित केलेला नाही.

सविस्तर वाचा -  त्यांना कळतो केवळ माणुसकीचा धर्म; ज्याच्या त्याच्या धर्मानुसार देतात अंतिम निरोप

२२ जुलै २०२० या शासन निर्णयानुसार ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिककरिता दरदिवशी ३० मिनिटे, पहिली ते दुसरी ३० मिनिटांची दोन सत्रे, तिसरी ते आठवी दर दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे आणि नववी ते बारावी दर दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच शाळा या शासनाच्या निर्णयानुसार कार्य करीत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com