सिंदखेडराजा तालुक्‍यात शालेय मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा) - साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील दोन शालेय मुलींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरीला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना शेंदुर्जन येथे सोमवारी दुपारी घडली.

साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या नेहा प्रभाकर गवई व श्रुती सुनील कामे या दोन विद्यार्थिनी आज शेंदुर्जन येथे पोचल्या. तेथे शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेतली. ही घटना आजूबाजूच्या युवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी या विद्यार्थिनींना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या मारल्या. त्यामध्ये श्रुती कामे हिला वाचवण्यात यश आले. मात्र, नेहा गवई खोल पाण्यात बुडाली. विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता नेहाचा मृतदेह दोन तासांनंतर सापडला. या घटनेचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, साखरखेर्डा येथून शेंदुर्जन येथे दोन नव्हे, तर तीन मुली आल्या होत्या. यातील एका मुलीचा भाऊ तिला घरी घेऊन गेला असल्याची चर्चा आहे.

Web Title: School Girl Student Suicide