रानवाडी येथील शाळा झाली जीर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जलालखेडा (जि.नागपूर ) :जि. प. शाळेच्या पटसंख्येत कमालीची घट येत आहे. याला एक नव्हे तर नाना प्रकारची करणे कारणीभूत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे आज या शाळांच्या इमारती कालबाह्य झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. याच इमारतीत विद्यार्थ्यांचा जीव मुठीत बसून बसविले जातात. अशाच काहीसा प्रकार नरखेड तालुक्‍यातील रानवाडी गावात सुरु आहे. शेवटी मुलांच्या जिवाला हानी होऊ नये म्हणून येथील शाळा अनसूया मातेच्या मंदिरात भरवली जाते.नरखेड तालुक्‍यात रानवाडी नावाचे गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची 1 ते 4 वर्गापर्यंतची शाळा आहे. या शाळेत 34 विद्यार्थी शिक्षण घेत असून दोन शिक्षक कार्यरत आहेत.

जलालखेडा (जि.नागपूर ) :जि. प. शाळेच्या पटसंख्येत कमालीची घट येत आहे. याला एक नव्हे तर नाना प्रकारची करणे कारणीभूत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे आज या शाळांच्या इमारती कालबाह्य झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. याच इमारतीत विद्यार्थ्यांचा जीव मुठीत बसून बसविले जातात. अशाच काहीसा प्रकार नरखेड तालुक्‍यातील रानवाडी गावात सुरु आहे. शेवटी मुलांच्या जिवाला हानी होऊ नये म्हणून येथील शाळा अनसूया मातेच्या मंदिरात भरवली जाते.नरखेड तालुक्‍यात रानवाडी नावाचे गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची 1 ते 4 वर्गापर्यंतची शाळा आहे. या शाळेत 34 विद्यार्थी शिक्षण घेत असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेच्या तीन वर्गखोल्या गावात आहे. पण या तीनपैकी एक वर्ग खोली मोडकळीस आली असून दुसरी नादुरुस्त आहे. एक खोली चांगली आहे, पण एकाच खोलीत चार वर्ग बसविले जातात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल व नादुरुस्त खोलीत मुलांना बसविले तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून गावक-यांनी व शिक्षकांनी मुलांच्या जीवाचा विचार करून दोन वर्ग शाळेच्या एका खोलीत तर दोन वर्ग गावातील अनसूया माता मंदिरात भरविण्याचा निर्णय घेतला. मंदिरात शाळा सुरु झाली आहे.

जीर्ण इमारत पाडण्याचे नाहरकत प्रमाणपत्र निघून चार महिने होत आले तरी मात्र ग्रामपंचायतीने कोणतीच कार्यवाही केली नाही.
पुरुषोत्तम बहेनिया
अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती
रानवाडी
शाळा मंदिरात भरत असल्याची माहिती नाही. एक खोली जीर्ण असल्यामुळे ती पडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तरी पण ग्रामपंचायतीने ती पडण्याबाबत अद्याप का कार्यवाही केली नाही. याची माहिती घेण्यात येईल.
दयाराम राठोड
खंडविकास अधिकारी
नरखेड पंचायत समिती

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School in Ranwadi collapsed