सैनीकबांधवांनसाठी चिमुकल्यांनी बनविल्या 101 राख्या 

संदीप रायपुरे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

गोंडपिपरी : देशातील नागरिक सुरक्षित रहावे म्हणून आपले सैनिक दिवसरात्र खडा पहारा देतात. एकदा कर्तव्यावर गेले कि महिनोंमहिने तिकडेच. त्यांच्या आयूष्यात सण, समारंभ साजरे करण्याचे फार कमी क्षण येतात. अशा सैनिकबांधवाना सलाम करण्यासाठी गोंडपिपरीच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थींनीनी स्वतः मेहनत करून 101 राख्या तयार केल्या अन त्यांना पाठविल्या. या चिमुकल्या बहिणींच्या सैनिक बांधवांसोबतच्या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनची चांगली चर्चा सूरू आहे. 

गोंडपिपरीची जिल्हा परिषद कन्या शाळा प्रयोगशिल शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या शिक्षकांची या शाळेची उज्वल, परंपरा अद्यापही कायम आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर शाळेच्या चिमुकल्यांनी राबविलेल्या एका उपक्रमाने पालकांचेही ऊर भरून आले. रक्षाबंधनाच्या पर्वावर घरातील विविध प्रकारच्या वस्तूपासून राखी बनवायची संकल्पना मुरलीधर सरकार या शिक्षकाने मांडली. यानंतर शाळेतील चिमुकले कामाला लागले. दोन दिवसात त्यांनी 101 राख्या तयार केल्या. यानंतर मुख्याध्यापक वानखेडे, खान, ठाकरे, कुळमेथे, शेंडे, कन्नाके आणि मुरलीधर सरकार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर राख्यांचा सदूपयोग वेगळ्या पध्दतीने करण्याचे नियोजन केले.

सिमेवर सैनिक बांधव दिवसरात्र खडा पहारा देतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाच बलीदान देतात. अशा सैनिकबांधवांना चिमुकल्या भगीणींनी तयार केलेल्या राख्या पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. मग जम्मू काश्मीर सिमेवरील बिएसएफच्या जवानांना या पुर्ण राख्या पोष्टाने पाठविण्यात आल्या. चिमुकल्यांनी दोन दिवस मेहनत घेत 101 राख्या तयार केल्या अन त्या सैनिकांना पाठविल्याची माहीती कळताच गावातील नागरीक, पालक या सर्वांना भरून आलं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसदादांना बांधण्यात आल्या. ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी त्यांचे कौतूक करीत शाबासकीची पाठ थोपाठली. 

101 राख्या स्वतः तयार करून सैनिक बांधवांना पाठविण्याचा संवेदनशिल उपक्रम कौतूकास्पद आहे. अशा उपक्रमाने शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांत सामाजीक सलोखा रूजविण्यासाठी मदत मिळेल.
- प्रदीप झाडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गोंडपिपरी

Web Title: school students made 101 Rakhi for soilder