विज्ञानची प्रश्‍नपत्रिका "यू-ट्युब'वर

यु-टयुब वरील पेपर
यु-टयुब वरील पेपर

विज्ञानची प्रश्‍नपत्रिका "यू-ट्युब'वर
नागपूर : शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागातर्फे 28 ते 31 ऑगस्टपर्यंत सहावी ते आठवीसाठी पायाभूत चाचणीतील विज्ञान शाखेचा पेपर 31 तारखेला घेण्यात आला. मात्र, एक दिवसांपूर्वीच म्हणजे 30 ऑगस्टला या पेपरचा व्हिडिओ "यू-ट्यूब'वर व्हायरल झाल्याची माहिती आहे. यामुळे पायाभूत चाचणीतील प्रश्‍नपत्रिकेच्या गोपनीयतेवर प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातील शाळांमध्ये दुसरी ते आठवीची 28 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत प्रथम भाषा, 29 ऑगस्टला गणित, तिसरी ते आठवीसाठी 30 ऑगस्टला इंग्रजी (तृतीय भाषा) आणि 31 ऑगस्टला सहावी ते आठवी विज्ञान विषयाची चाचणी घेण्यात आली.
31 ऑगस्टला असलेल्या सहावी, सातवी आणि आठवी या तिन्ही इयत्तेतील विज्ञान विषयाचा पेपर 30 तारखेलाच "यू ट्यूब'वर अपलोड केल्याचे दिसले. या व्हिडिओमध्ये केवळ पेपरच नव्हे तर त्याचे उत्तरही टाकले आहेत. व्हिडिओला 18 हजार 400 लाईक्‍स आहेत. एमएससीईआरटीतर्फे पायाभूत चाचणीचे पेपर गोयनीय असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दरवर्षीच पेपर व्हायरल होत असल्याचे दिसून येते. एमएससीईआरटीचे संचालक सुनील मगर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
समितीचे काय?
पायाभूत चाचणीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गुणवाढ होऊ नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात येते. समितीतील अधिकारी व सदस्य प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करतात. असे असतानाही विद्यार्थ्यांना पुस्तकातून बघून प्रश्‍न सोडविण्याची परवानगी शाळांकडून देण्यात येते. दुसरीकडे बऱ्याच शाळांमध्ये अद्याप पायाभूत चाचणी घेतलेली नाही. त्यामुळे या शाळांवर विभाग कारवाई करणार का, हा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com