"स्क्रब टायफस'ची विदर्भात दहशत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नागपूर, यवतमाळ : पावसाळा आला की, स्वाइन फ्लू, डेंगी, मलेरिया हे साथरोग नेहमीचेच आहेत. परंतु, यंदा "स्क्रब टायफस' या आजाराचा विळखा विदर्भाला बसला आहे. विदर्भात 30च्या वर रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 7 जण दगावल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. 100 अंशापेक्षा अधिक ताप स्क्रब टायफस असल्याची शक्‍यता मेडिकलच्या वैद्यकतज्ज्ञांनी वर्तविली. सध्या नागपुरातील मेडिकलमध्ये सात, मेयोत तीन व यवतमाळात 4 "स्क्रब टायफस'चे रुग्ण आहेत.

यवतमाळ येथील हिराचंद मुणोत क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ता. 15 ऑगस्ट रोजी चार रुग्णांना "स्क्रब टायफस' रोगाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्या चौघांवरही वेळीच उपचार करण्यात आल्याने ते बरे होऊन घरी परत गेले. सीमावर्ती गवताळ भागात आढळणारा हा आजार जिल्ह्यात शिरल्याची माहिती सर्वप्रथम या हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक अग्रवाल यांनी दिली होती व त्याबाबतचे वृत्तही "सकाळ'नेच सर्वप्रथम दिले होते. आता विदर्भातील अनेक भागांत "स्क्रब टायफस'च्या आजाराचे निदान होत आहे, हे विशेष.
स्क्रब टायफस निदानासाठी उपराजधानीतील मेडिकलमध्ये किट उपलब्ध नव्हत्या. याबाबत सकाळमध्ये वृत्त प्रकाशित होताच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी 120 जणांची तपासणी होईल, अशा चार किट मंगळवारी उपलब्ध करून दिल्या. यामुळेच मेडिकलमध्ये पहिल्यात दिवशी सात जणांचे निदान झाले. मेयो रुग्णालयातील 3 तर मेडिकलमधील 7 सात जणांना स्क्रब टायफस झाल्याची माहिती पुढे आली. मानवापासून मानवाला होणार हा आजार नाही. मात्र, स्क्रब टायफस पसरण्यास पिसूसारखे सक्ष्म किडे कारणीभूत ठरतात. यामुळे कीटक सर्वेक्षण, फवारणी व मॅलेथिऑन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता, सर्वेक्षणात आढळून आलेल्या संशयित रुग्णांवर डॉक्‍सिक्‍लाईन किंवा झिथ्रोमायसी औषधोपचार करावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जारी करण्यात आल्याचे डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सीताबाई नागपुरे या 63 वर्षीय महिलेचा "स्क्रब टायफस'मुळेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. नवीन रुग्ण आढळल्याने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Scrub Typhus news