देवळी कला येथे आढळला स्क्रब टायफसचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

कुही (जि.नागपूर):  तालुक्‍यातील राजोला सर्कल अंतर्गत येणाऱ्या देवळी कला येथे स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आला. फुलनबाई बालकदास चव्हाण (वय 58) याना स्क्रब टायफस पॉजिटिव्ह असल्याचा रिपोर्ट 3 ऑक्‍टोबरला डॉ. नरांजे यांनी रक्ततपासणी करून दिला. 
फुलनबाई चव्हाण यांना पंधरा दिवसांपूर्वी जोराचा ताप आला. त्याचसोबत डोकेदुखी व अंग दुखण्याचाही त्रास होता. तेव्हा मुलगा सुरेश याने कुहीच्या डॉ. डहरवाल यांच्याकडे औषधोपचारासाठी नेले. चार दिवसानंतरही आराम पडला नाही. त्यानंतर मांढळचे डॉ. पांडे यांच्याकडेही उपचार घेतला. 

मात्र ताप कमी होत नव्हता. अखेर नागपूरच्या सक्करदरा भागातील इटकेलवार हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे डॉ. एम. डी. नरांजे यांच्या लॅबमधे रक्ततपासणी केली तेव्हा त्यांनी स्क्रब टायफस पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला. त्यानुसार इटकेलवार हॉस्पिटलमध्ये डॉ. रतनसिंग जुगणे यांनी औषधोपचार सुरू केला. सध्या औषधोपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा असल्याचे त्यांचा मुलगा सुरेश चव्हाण यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे हा आजार मागील वर्षी कुही तालुक्‍यात तारणा येथे दोन महिलांना झाला होता. या वर्षीसुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहिम अधिक गतिमान करण्याची आवश्‍यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे म्हणाले.  आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हा आजार आफ्रिकेतील गवताळ प्रदेशातून आलेला आहे. जोराचा ताप, अंगदुखी, डोकेदुखी असेल तर तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात रक्ततपासणी करुन घ्यावी तसेच परिसर स्वच्छता ठेवावी, कामाला जाताना अंगभर कपडे परिधान करावेत, स्वतः घरीच औषधोपचार करू नये, सर्वच शासकीय आरोग्य केंद्रात मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A scrub typhus patient found at Deoli kala