तेंदूपत्ता हंगामात माओवाद्यांचा हैदोस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

तेंदूपत्ता हंगामात खंडणीसाठी तेंदूपत्ता कंत्राटदार दबाव टाकण्याच्या हेतूने माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हात हैदोस घातला. गेल्या काही दिवसांत पोलिस खबऱ्याची हत्या, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

गडचिरोली : तेंदूपत्ता हंगामात खंडणीसाठी तेंदूपत्ता कंत्राटदार दबाव टाकण्याच्या हेतूने माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हात हैदोस घातला. गेल्या काही दिवसांत पोलिस खबऱ्याची हत्या, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

दुर्गम भागातील काही पोलिस ठाण्यांना टार्गेट करण्याचाही प्रयत्न झाला. एकटे दुकट्या पोलिस जवानांना लक्ष्य करून घटना घडवून आणल्या जात असल्याने जिल्हा पोलिसांनी नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांच्या विरोधात तीव्र अभियान सुरू केले. गेल्या आठवडाभरात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावर दोघांची हत्या करण्यात आली.

Web Title: Season of Tendupatta Naxalite Attack Gadchiroli

टॅग्स