माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आरक्षित जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - जून महिन्यापासून विविध महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. याअनुषंगाने नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे परिपत्र विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केले.

विद्यापीठाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयांमध्ये (अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, कला, वाणिज्य व अध्यापक महाविद्यालये) सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना आरक्षित जागांवर प्रवेश देणे बंधनकारक राहणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय आहे. सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश देतेवेळी माजी सैनिकांच्या पाल्याकडे संबंधित जिल्हा सैनिककल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेले माजी सैनिक पाल्य असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रनुसार विद्यापीठाशी संबंधित सर्व महाविद्यालयांना सैनिकांच्या पाल्यांसाठी राखीव जागा ठेवणे अनिवार्य होणार आहे.

Web Title: The seats reserved for ex-servicemen