"सेकंड हॅण्ड' वाहनविक्रीवर मरगळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नागपूर :  बदलते राहणीमान, वाढलेल्या कुटुंबामुळे चारचाकी गाड्यांची गरज प्रत्येकालाच वाटते. यातूनच चारचाकी वाहन खरेदीला झळाळी आली होती. नव्या वाहनांच्या किमती खिशाला परवडणाऱ्या नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंब सेकंड हॅण्ड गाड्यांना पसंती द्यायचे. परंतु, नोटाबंदी, जीएसटीनंतर या व्यवसायावर अवकळा पसरली होती. ती अद्याप कायम असल्याने सेकंड हॅण्ड गाड्यांची विक्री तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घटली आहे. तसेच जुन्या वाहनांचे बाजारमूल्यही 30 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

नागपूर शहरात 50 पेक्षा अधिक जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणारे ब्रोकर्स आहेत. शहरातील इतवारी, ग्रेट नाग रोड, सदर, बजाजनगर, वाडी, कळमना आदी परिसरात या वाहनांचा बाजार आहे. जीएसटी आणि नोटाबंदीपूर्वी या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत होती. नोटाबंदीचा पहिला फटका या व्यवसायाला बसला. त्यातून सावरण्यापूर्वीच वाहनावर 28 टक्के जीएसटी लावल्याने वाहन उद्योग अडचणीत सापडला. विम्याच्या दरात वाढ, आर्थिक मंदी व वाढलेल्या जीएसटीमुळे ग्राहकांनी नवीन वाहने खरेदी करणे बंद केल्याने अनेक कंपन्यांचे शोरूम बंद पडले. परिणामी, जुन्या बाजारात गाड्या विक्रीसाठी येण्याचे प्रमाण घटले. त्याचा फटका ब्रोकर्सला बसत आहे. वाहन खरेदी करताना पूर्वी सहज कर्जही उपलब्ध करून देण्यात येत होते. आता बॅंकांकडून या वाहनांसाठी कर्ज उपलब्ध होत नसल्यानेही या व्यवसायाची झळाळी कमी झालेली आहे. त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कधी पंधरा तर कधी महिना महिना ग्राहक आमच्या शोरूमकडे फिरकतच नाही. या स्थितीमुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. अशीच स्थिती काही दिवस राहिल्यास ब्रोकर्सलाही बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.
----
नोटाबंदी, जीएसटीनंतर जुन्या वाहनांच्या विक्रीत घसरण सुरू झाली. ती अद्याप कायम आहे. या व्यवसायात 50 टक्के घट झालेली आहे. वाहनावर लावलेला 28 टक्के जीएसटी अन्यायकारक आहे. तो कमी केल्याशिवाय या व्यवसायाला झळाळी येणार नाही.
-भाऊसाहेब कोकणे, अध्यक्ष, नागपूर व्हेकल ब्रोकर्स असोसिएशन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Hand 'Vehicles On Sale