आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील पाच हजार 357 जागांवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाद्वारे काढण्यात आलेल्या पहिल्या सोडतीत 3 हजार 543 पाल्यांचे प्रवेश देण्यात आले. शनिवारी काढण्यात आलेल्या दुसऱ्या सोडतीत 2 हजार 448 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना 10 मेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. 

जिल्ह्यातील 662 शाळांमधील 25 टक्के राखीव असलेल्या 6 हजार 985 जागांवर प्रवेशासाठी आरटीईची प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. यासाठी नागपूर जिल्ह्यातून 24 हजारांवर अर्ज आले होते. यानंतर 28 फेब्रुवारीला पहिली सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये जिल्ह्यातील 5 हजार 357 विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याचे ठरले. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमध्ये रहिवासी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा द्यावा लागतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भाडे कराराचा खोडा निर्माण झाल्याने काही प्रवेश रखडले होते. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही जवळपास अडीच हजारांवर प्रवेश झाले होते. शिक्षण विभागाने आता 13 एप्रिलपर्यत तिसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ दिली. त्यात 60 टक्केच प्रवेश झाल्याचे दिसून आले. आज शनिवारी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 2 हजार 448 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रवेशासंदर्भात एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यांना 10 मेपर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे. 

Web Title: second selection list of RTE