आनंदवार्ता...नागपूरमार्गे सिकंदराबाद-रक्‍सोल विशेष रेल्वे 

file photo
file photo

नागपूर  : दसरा, दिवाळी आणि छटपूजा आटोपली असली, तरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कायम आहे. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने रेल्वेतील गर्दी अधिकच वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नागपूरमार्गे सिकंदराबाद-रक्‍सोल विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी डिसेंबर महिन्यात पाच फेऱ्या करणार आहे. यामुळे लग्नसराईसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
07091 सिकंदराबाद-रक्‍सोल साप्ताहिक विशेष रेल्वे 3 ते 31 डिसेंबरदरम्यान प्रत्येक मंगळवारी रात्री 9.40 वाजता सिकंदराबादहून रवाना होईल. बुधवारी सकाळी 7.35 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 6.15 वाजता रक्‍सोल स्थानकावर आगमन होईल. तसेच 07092 रक्‍सोल-सिकंदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे 6 डिसेंबर ते 3 जानेवारीदरम्यान प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता रक्‍सोलहून रवाना होईल. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि रविवारी सकाळी 6.55 वाजता सिकंदराबाद स्थानक गाठेल. या गाडीला काजीपेठ, रामागुण्डम, मंचेरियाल, बल्लारशा, सेवाग्राम, बैतूल, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, अलाहाबाद चेवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्‍शन, बक्‍सर, आरा, दानापूर, पटना, बख्तीयारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा, सीतामढी आणि बैरगनिया स्थानकावर थांबा दिला आहे. एकूण 19 डब्यांच्या या गाडीला एक द्वितीय श्रेणी, चार तृतीय श्रेणी वातानुकूलित, दहा स्लीपर आणि दोन जनरल डबे राहतील. लग्नसराईत धावणाऱ्या या लांब पल्ल्याच्या गाडीमुळे प्रवाशांना अधिकचे बर्थ उपलब्ध होणार असून, आरामदायी प्रवासही करता येईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com