सुरक्षा देणाऱ्या पोलिसांना ठेवायचे कुठे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जवळपास निश्‍चित झाले. प्रशासनाकडून त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी चार कोटींवर खर्च येणार आहे. येथे येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय करण्याकरिता प्रशासनाची मोठीच तारांबळ उडणार असल्याचे दिसते.

आतापर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झाले. थंडीपासून बचावण्यासाठी अनेक ठिकाणी चौकात त्यांच्या राहाण्याची सोय करण्यात येते. हिवाळा असल्याने दिवासाची फारशी अडचण होत नव्हती. कर्मचारी दाटीदाटीने राहत असे. १६० खोलींचे गाळेही रिकामे करून तिथे मुंबई व इतरत्र येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. यंदा प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. 

पावसाळी अधिवेशनची तयारी करण्यासाठी प्रशासनासमोर अनेक अडचणी येणार असून त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. पावसाळी अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर विभागांचे मिळून १२ ते १४ हजार कर्मचारी दाखल होतील. त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. हिवाळ्यात साध्या टेंटमध्ये कर्मचारी रात्र काढतात.

पावसाळ्यात मात्र दिवसा तसेच रात्री पावसापासून बचाव करण्याची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. 

वाहनचालकांचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. १६० खोल्यांतील गाळेधारकांसोबत ९ ते १० महिन्यांचा करार करण्यात येते. नुकताच यांच्यासोबत करार करण्यात आला. त्यामुळे ते खाली करणेही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मंगळवारला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यात या प्रश्‍नावर मंथन झाल्याची माहिती आहे.

Web Title: security police rainy session