तीन कोटींचे बियाणे स्वाहा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

शॉर्टसर्किटचे कारण; रात्रभर कोणाच्याच लक्षात आले नाही
बाजारगाव/कोंढाळी - वडधामना येथील महामार्ग क्रमांक ६ ला लागून असलेल्या जानकी सीड्‌स ॲण्ड रिसर्च या कंपनीच्या गोदामाला आग लागून तिथे साठवलेले सुमारे३ कोटी किमतीचे बियाणे जळून खाक झाले.

वडधामना परिसरात राष्ट्रीय महामार्गाला लागून जानकी सीड्‌स ॲण्ड रिसर्च या कंपनीचे बी-बियाणे साठवणूक गृह आहे. बुधवारी रात्री अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार वादळवाऱ्याने विजेचे तार शॉर्ट झाले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गोदामाला आग लागली. 

रात्री उशिराची घटना असल्यामुळे पहाटेपर्यंत आग लागल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. सर्वप्रथम सकाळी तिथे जवळच असलेल्या हमालाच्या ही घटना लक्षात आली. त्याने तातडीने हालचाल करून पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली. कंपनी संचालक अनिल धुमारे यांनासुद्धा घटनेची माहिती दिली.

घटना लक्षात येताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठले. आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न करेस्तोवर आगीने रौद्र रूप घेऊन तिथे साठवलेले संपूर्ण बी-बियाणे भस्म झाले होते. साठवणगृह रमेश चावला यांच्या मालकीचे असून जानकी सीड्‌सने ते  वर्षभरापूर्वी भाड्याने घेतले होते.

यात धान पाच हजार क्‍विंटल, सोयाबीन चार हजार क्‍विंटल, उडीद दोन हजार क्‍विंटल व सुमारे ८००० क्‍विंटल टमाटर, वांगी, पालक या भाजीपाल्याचा बियाण्यांचा समावेश होता. अग्निशमन दल व महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या येऊन आग आटोक्‍यात आणेस्तोवर गोदामातील सर्व बियाणे आगीच्या भक्ष्यस्थानी ठरले. रात्रीची वेळ असल्याने व गोदाममध्ये कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. 

घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक राजाराम ढोरे, बिजेंद्र सिंग, शिपाई अनिल  इंगळे हे घटनास्थळी पोचले. गोदामातून विदर्भातील सर्व दूरच्या तालुक्‍याच्या ठिकाणी बी-बियाण्यांचा पुरवठा केला जातो अशी माहिती कंपनीचे मालक संजय रमाशंकर ठाकूर यांनी  मोबाईलवर संपर्क साधला असता कळली.

Web Title: seed loss in fire