समाजात कार्यकर्ताच पेरतोय क्रांतीचे बीज

यवतमाळ : काष्ठशिल्पकलेतून निर्मित बुद्धमूर्तीसह स्तूपांच्या कलाकृती.
यवतमाळ : काष्ठशिल्पकलेतून निर्मित बुद्धमूर्तीसह स्तूपांच्या कलाकृती.

यवतमाळ : आंबेडकरी आंदोलनाला कथा, कविता, कादंबरी, नाट्य, पथनाट्य, कव्वाली, चित्रकलेने बळ देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हा लढा संघर्षातून पुढे जात असताना अनेक स्थित्यंतरे आलीत. कार्यकर्ता नावाचा आंदोलक निराश झाला नाही. काष्ठशिल्पकलेतून आंबेडकरी आंदोलनाला ऊर्जा देण्याचे काम करीत आहे.

काष्ठशिल्पकलेतून क्रांतीचे बीज पेरणाऱ्याचे काम

मूळचे वणी येथील असलेले अविनाश दिग्विजय हे काष्ठशिल्पकलेतून क्रांतीचे बीज पेरणाऱ्याचे काम करीत आहेत. भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदात ते नोकरी करतात. यवतमाळ येथील 14व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात ब्लास्ट (बुद्धिस्ट लिटरेचर, आर्ट सॉंग ऍण्ड थिएटर)द्वारे काष्ठशिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. काष्ठशिल्पकलेचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण न घेता अविनाश हे अनुभवातून शिकलेत. गेल्या 2011पासून काष्ठशिल्पातून शोभेच्या वस्तू बनविल्या. समता सैनिक दलाचे महाराष्ट्र संघटक म्हणून सामाजिक संघटनेत काम करतात. डोक्‍यात सतत आंबेडकरी आंदोलन असल्याने काष्ठशिल्प कलेतून चळवळीला ऊर्जा देण्यासाठी काही तरी वेगळं करण्याची कल्पना सुचली. 

स्तूपांची आकर्षक निर्मिती

सम्राट अशोकाचा काळ हा बौद्ध धम्माच्या उत्कर्षाचा काळ आहे. त्याला स्वर्निम युग म्हटले जाते. सम्राट अशोकाने देशभरात 84 हजार स्तुपांची निर्मिती केली. सम्राट ब्रुह्रदरथाच्या हत्येनंतर प्रतिक्रांती झाली आणि अन्याय, अत्याचाराला प्रारंभ झाला. अविनाश दिग्विजय यांनी काष्ठशिल्पकेतून सांची, दीक्षाभूमी, काठमांडू, अफगणिस्तान येथील स्तूपांची आकर्षक निर्मिती केली आहे. जुलूमाने परिसीमा गाठली असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांनी सर्वहारा समूहाला अधिकार मिळवून देण्यासाठी क्रांतीचे बिगुल फुंकले. येथून आंबेडकरी युगाला सुरुवात झाली. धर्मांतरामुळे सामाजिक, धार्मिक व तात्त्विक बदल घडून आलेत. मात्र, प्रस्थापितांविरोधातील लढा हा सुरूच राहिला. दिग्विजय यांनी "पेना'च्या माध्यमातून विविध कन्सेप्टला आकार दिला. जळालेल्या लाकडाला पेनाचा आकार देवून नामांतर आंदोलनाची आठवण करून दिली. ""जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी तोडले नाही तुला'' सुरेश भटांच्या ओळींचा वापर चपखल केला आहे. संपूर्ण जग हिंसेच्या वळणावर आहे.""कलिंग से केवल सम्राट अशोक लौट रहे है और बाकी सब कलिंग का पता पुछ रहे है'', त्याला पर्याय बुद्धच आहे, असाच संदेश काष्ठप्रदर्शन देते आणि आंबेडकरी आंदोलन मांडण्याचा अनोखा प्रयोगदेखील यानिमित्ताने होत आहे.


जंगलाची पायवाट तुडविल्यास विविध आकारांचे कीड लागलेले ओंडके मिळतात. त्यात एक सुंदरता लपलेली असते. ती टिपून काष्ठशिल्पातून आकार देण्याचे काम करतो. नागवला गेलेला समूह वज्रमुठ बांधून क्रांतीची मशाल धगधगत ठेवून आपला लढा असा पुढे नेत आहे.
-अविनाश दिग्विजय, काष्ठशिल्प कलावंत, भद्रावती.

साहित्यिकांकडून कौतुकाची थाप

आंबेडकरी साहित्य संमेलनातील काष्ठशिल्प प्रदर्शन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. येथे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. महेंद्र भवरे, पटकथाकार तथा उद्‌घाटक शिल्पा कांबळे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, नाट्यकलावंत संजय जीवने, लोकनाथ यशवंत आदी मान्यवरांसह रसिकांनी भेट देवून दिग्विजय यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com