अबब...चोरट्यांकडून तब्बल 56 मोबाईल जप्त

seize mobil from robbers
seize mobil from robbers

बुलडाणा : एका सराईत मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (ता.13) अटक केली. अकोल्यातील या मोबाईल चोरट्याकडे तब्बल 56 मोबाईल हँडसेट मिळाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, 23 जून रोजी बुलडाणा पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला या मोबाईल चोरट्याची माहिती मिळाली. अकोला येथील 40 काॅटर अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 305 मध्ये राहणारा श्रीकृष्ण बळीराम गाडगे याच्यावर पोलिसांचा संशय होता.

अकोला, वाशीम व वर्धा येथून मोबाईलची चोरी
तो अकोला, वर्धा, वाशीम आदी ठिकाणचे मोबाइल हँडसेट चोरतो व विकतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथे जाऊन शिताफीने त्याला पकडून आणले. त्याच्याकडून विवो, सॅमसंग, एम आय, रेडमी, ओपो, नोकिया, मोटोरोला, जिओ, इंटेक्स लीवोनो, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे 56 मोबाईल जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत पाच लाख बत्तीस हजार 800 रुपये आहे. 

बुलडाणा पोलिसांकडे तपास
मी हे मोबाईल शहरातील बस स्थानक आठवडी बाजार वगैरे या ठिकाणाहून चोरून आणले असल्याचे आरोपीने सांगितले. बुलडाणा पोलिस पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर संदीप पखाले, पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यवाही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com