नवीन बीना बाजारात माऊजर जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

खापरखेडा (जि. नागपूर) : नवीन बीना बाजारात एका व्यक्तीकडून खापरखेडा पोलिसांनी आटोमॅटिक माऊजर जप्त केली. राधेश्‍याम ऊर्फ चिकन चरण सनेश्‍वर (वय 25, रा. बीना संगम, ता. कामठी) असे आरोपीचे नाव आहे. 

खापरखेडा (जि. नागपूर) : नवीन बीना बाजारात एका व्यक्तीकडून खापरखेडा पोलिसांनी आटोमॅटिक माऊजर जप्त केली. राधेश्‍याम ऊर्फ चिकन चरण सनेश्‍वर (वय 25, रा. बीना संगम, ता. कामठी) असे आरोपीचे नाव आहे. 
खापरखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन बीना येथील बाजारात असलेल्या एका पानटपरीवर आरोपी राधेश्‍याम याच्याजवळ माऊजर असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे कारवाई करून आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याने परिधान केलेल्या जिन्समधून कमरेच्या डाव्या बाजूला ऑटोमॅटिक हॅडमेड माऊजर पिस्टर आढळून आले. सोबतच्या त्याच्याजवळ एक जिवंत काडतूस आढळून आले. आरोपीजवळून माऊजर व काडतूस असा 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खापरखेडा पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सचिन मत्ते, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, नीलेश बर्वे, शैलेश यादव, वीरेंद्र नरड, प्रणय बनाफर, साहेबराव बहाळे यांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seize the gun