बारा किलो गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 12 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत मार्केटमध्ये एक लाख 20 हजार रुपये आहे.

नागपूर : गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 12 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत मार्केटमध्ये एक लाख 20 हजार रुपये आहे.
अमरावती येथील रहिवासी हेमंत भाऊराव डाखोरे (48, रा. गोपालनगर, राजापेठ), लक्ष्मण विश्‍वास ढोलवाडे (53, रा. धामोरी, भातकुली) व भूरेखॉं रमजानखान पठाण (75, इतवारा चौक, नागपुरी गेट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही गांजाची खेप घेऊन नागपुरात येत असल्याची माहिती खबऱ्याने गणेशपेठचे हवालदार सूर्यकांत इंगळे आणि राष्ट्रपाल राऊत यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी जाधव चौकातील अग्निशमन केंद्राच्या बाजूला सापळा रचला. तिन्ही आरोपी जाधव चौकात येताच पोलिसांनी पडकले. त्यांच्याजवळ असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यात 12 किलो ओलसर गांजा मिळून आला. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत लोणारे, सुनीत गुजर यांनी ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seize the marijuana