यवतमाळ - दारव्हा येथे तीन कोटींचा गुटखा पकडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

दारव्हा (यवतमाळ) : पोलिसांनी दारव्हा येथे दोन कोटी 80 लाखांचा गुटखा पकडला. रविवारी (ता. 3) मध्यरात्री अडीचच्या सुमारास येथील रेल्वेस्थानक परिसरात पेट्रोलिंगवर असताना ही कारवाई पोलिसांनी केली. 70 किलोच्या 200 गोण्या असा एकूण दोन कोटी 80 लाखांचा 140 क्विंटल गुटखा व 15 लाखांचा ट्रक असा एकूण तीन कोटींचा जवळपास मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दारव्हा पोलिस उपविभागातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 

सोमवारी (ता. 4) औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमक्ष मालाची मोजणी व पंचनामा करण्यात आला. त्यावेळी ट्रकमध्ये 70 किलो दोनशे पोते भरून असलेला खुल्या स्वरूपातील गुटखा आढळला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्यात आला.

रविवारी मध्यरात्री गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे व संतोष माने यांना रेल्वेस्थानक परिसरातून ट्रक (क्रमांक एम. एच.27 एक्स 8889) संशयास्पदरीत्या मालाची वाहतूक करताना आढळला. शंका आल्याने त्यांनी ट्रक थांबून तपासणी केली. त्यात गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने ट्रकचालक शेख महफूस शेख महेबूबसह ट्रक ताब्यात घेतला. परंतु, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. सोमवारी पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे व संदीप सूर्यवंशी यांनी ट्रकमधील मालाची मोजणी व पंचनामा केला. त्यावेळी 70 किलोच्या दोनशे पोत्यांत खुल्या स्वरूपातील गुटखा आढळला.

साठा जाणार होता कर्नाटकात
अन्नसुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाईसाठी गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला. दरम्यान, खुला गुटखा दिल्लीवरून नागपूरमार्गे बिदर (कर्नाटक) येथील कारखान्यात पॅकिंगसाठी जात अडल्याचे अटकेतील संशयितांनी सांगितले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मुपडे व संतोष माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: seized 3 crores gutkha in darvha yawatmal