संशयास्पद स्कॉर्पिओमधून 52 लाख रुपये जप्त, देशी कट्यासह चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खामगाव : स्कॉर्पिओमधून लाखोंची रोकड घेवून जाणाऱ्या चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडल्याची घटना आज (ता.27) सकाळी खामगाव - नांदुरा महामार्गावर चिखली खुर्द येथे घडली. पोलिसांनी आरोपींकडून देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी, 52 लाख 72 हजार रुपये जप्त केले असून चौघांना ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेसह दोन आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

खामगाव : स्कॉर्पिओमधून लाखोंची रोकड घेवून जाणाऱ्या चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडल्याची घटना आज (ता.27) सकाळी खामगाव - नांदुरा महामार्गावर चिखली खुर्द येथे घडली. पोलिसांनी आरोपींकडून देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी, 52 लाख 72 हजार रुपये जप्त केले असून चौघांना ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेसह दोन आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वाहतुक पोलिस कर्मचारी शे.रफिक व दिनक राठोड हे दोघे आज महामार्ग क्रमांक 6 वरील जुगनू हॉटेलजवळ  वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान त्यांना दिल्ली पासींगची एक स्कॉर्पिओ संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. त्यांनी गाडीचा पाठलाग करुन चालकास थांबविले. जुन्या टोलनाक्याजवळ गाडीचे कागदपत्रे तपासणी करत असताना गाडीत बसून असलेल्या पाच जण घाबरलेल्या स्थितीत दिसून आले. यावेळी चालकास गाडीची डिक्की उघडण्याच्या सुचना केली असता चालकाने गाडीत बसून पळ काढला.

यावेळी वाहतूक पोलिसांनी समोर नाकाबंदीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यासोबत संपर्क साधला व डीएल 4 सी एएफ 4943 क्रमांकाची स्कार्पिओ थांबविण्याचे सांगितले. मात्र नाकाबंदी असतानाही स्कॉर्पिओ चालकाने सुसाट वेगाने काढी काढून पोलिसांना चकमा दिला. यावेळी पोलिसांनी पाठलाग सुरु केला असता स्कॉर्पिओ गाडी चिखली खुर्द शिवारात बेवारस उभी असल्याचे दिसून आले. यावेळी शेतता काम करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चौकशी केली असता गाडीतील सर्व आरोपी वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याचे सांगण्यता आले. यावेळी  चिखली खुर्द गावात काही नागरिकांनी दोघांना बॅगसह पकडले. या बॅगीमध्ये पैसे व देशी कट्टा असल्याचे दिसून आल्याने गावकऱ्यानी दोघांना पोलिसांच्या स्वाधिन केले. तर दोघा आरोपींना नांदुरा रोडवरील एका ढाब्यावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दल्ला मजीद, इरफान खान जाणू खान सर्व रा. हरियाणा या  चौघा आरोपींची  झाडाझडती  घेतली असता त्यांच्याजवळ एक रिवॉल्व्हर, 52 लाख 72 हजार रुपये रोकड, मोबाईल मिळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. तर एक महिला व एक जण असे दोन आरोपी पसार असल्याची माहिती आहे. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, जलंब पोस्टेचे ठाणेदार गाढे, शिवाजी नगर पोस्टेचे प्रदिप ठाकूर, ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार शेख, पिएसआय शक्करगे, पीएसआय बोरसे, घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. चौकशी नंतर खरा प्रकार समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: seized 52 lakhs from Scorpio 4 arrested