यवतमाळ जिल्हाकचेरीवर जप्तीची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

यवतमाळ : वाढीव मोबदल्यासाठी शनिवारी (ता.21) जप्ती टळली असताना आज, बुधवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली. भूसंपादनाचा मोबदला न दिल्याने दोन संगणक जप्त करण्यात आले.

यवतमाळ : वाढीव मोबदल्यासाठी शनिवारी (ता.21) जप्ती टळली असताना आज, बुधवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली. भूसंपादनाचा मोबदला न दिल्याने दोन संगणक जप्त करण्यात आले.
राळेगाव तालुक्‍यातील झुल्लर येथील शेतकरी सोमेश्‍वर महाजन यांची शेतजमीन शासनाने गावठाणच्या पुनर्वसनासाठी 1996 मध्ये संपादित केली होती. या शेतजमिनीचा पूर्ण मोबदला आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे महाजन यांनी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यवतमाळ यांच्या न्यायालयात वसुली प्रकरण दाखल केले. न्यायाधीश सी. एल. देशपांडे यांनी एक कोटी 31 लाख रुपयांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती वॉरंट जारी केला. त्यानुसार आज, बुधवारी शेतकरी सोमेश्‍वर महाजन हे ऍड. नीलेश चवरडोल व बेलिफ अनिल निकम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी दोन संगणक जप्त करण्यात आले. या जप्तीमुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seizure fiasco over Yavatmal district office