निवडलेला हॉकी संघ अधिकृत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

नागपूर : बिलासपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी विदर्भातून निवडलेल्या 15 खेळाडूंच्या नावावर हॉकी इंडियाने आक्षेप घेतल्याने विदर्भ हॉकी असोसिएशन व निवड समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण निवडलेला संघ अधिकृत असल्याचा दावा केला. न्यायालयाने यावर सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देऊन सुनावणी स्थगित केली.

विदर्भ हॉकी असोसिएशनने 17 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी पंधरा खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. विदर्भ हॉकी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार हॉकी इंडियाकडे करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने कार्यकारी संचालकांनी सात जानेवारी 2019 रोजी असोसिएशनचे सदस्यत्व रद्द केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि सचिव विनोद गवई यांनी यास न्यायालयात आव्हान दिले आहे.
निवड समिती स्थापन करण्याचे आदेश
हॉकी इंडियाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेकरिता विदर्भाची चमू निवडण्यासाठी हायकोर्टाच्या वतीने एक निवड समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सोबतच निवड समितीच्या नावांची यादी हॉकी इंडियाला पाठवावी व हॉकी इंडियाने निवडलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी द्यावी असेही आदेश कोर्टाने दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार विवेक सिरिया यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली. समितीने 15 खेळाडूंचा संघ बिलासपूर स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. मात्र समितीच्या नावावरसुद्धा आक्षेप घेण्यात आला असल्याने समिती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selected Hockey Team Official