सेमिस्टर प्रणाली बंद होणार नाही

file photo
file photo

नागपूर : सेमिस्टर पद्धती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना मारक ठरत असल्याचा आरोप होत असला तरी ती बंद करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा कुठलाही विचार नसल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रो. डी. पी. सिंग यांनी आज स्पष्ट केले. एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेशी भारतीय पद्धतीला समतुल्य करण्यासाठी सेमिस्टर प्रणाली आवश्‍यक असल्याचे सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांना सेमिस्टर प्रणाली सुरू केली. पदव्युत्तरसाठी सात वर्षांपासून सेमिस्टर पद्धती सुरू आहे. यामुळे महाविद्यालयाचे सत्र सुरू होताच दोन महिन्यांमध्ये परीक्षा घ्यावी लागते. सत्र सुरू होताच प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन पेलावे लागते. तर विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक परीक्षा आटोपणे कठीण होत असते. नागपूर विद्यापीठामध्ये दर वर्षाला बाराशेहून अधिक परीक्षा होत असतात. यातील बीएसस्सी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा या किमान दीड महिना चालतात. अशा काळात सेमिस्टर पद्धतीमध्ये परीक्षा संपविणे, त्यांचा वेळेत निकाल देणे कठीण होत असते. याचा परिणाम बघता मागणी काळामध्ये नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व अडचणींचा विचार करता येत्या काळात सेमिस्टर पद्धती बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे आली होती. मात्र, आता खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनीच सेमिस्टर प्रणाली बंद करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे शिक्कामोर्तब केले. राज्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही काही महिन्यांआधी झालेल्या कुलगुरूंच्या बैठकीतही सेमिस्टर पद्धती बंद होणार नाही, अशी माहिती दिली होती. त्यामुळे आता विद्यापीठांना सेमिस्टर प्रणाली सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com